मोबाईल लिजेंडस: बँग बँग हा अँड्रॉइडचा 5v5 MOBA खेळ आहे जो आपल्या आवडत्या हिरोंनी बनलेल्या खर्या खेळाडुंचा एकमेकांशी सामना करवितो. एकदा का आपण डाऊनलोड करुन इंस्टॉल केलात कि आपले युद्ध कौशल्य दाखविण्यासाठी आपल्या लक्षात येईल ह्याची गतिमान आणि अचूक मॅचमेकिंग सिस्टम आणि विस्मयकारक युद्धे. लवकरच हे ही लक्षात येईल कि मोबाईल लिजेंडस हा आपण शोधत असलेला ऑनलाईन मल्टीप्लेयर युद्ध रणांगण आहे!
मोबाईल लिजेंडसचा गेमप्ले हा अगदी क्लासिक MOBA खेळांसारखाच तीन विविध ओळीत ५ विरुद्ध ५ युद्ध करतात. लक्ष्य? शत्रुंना हरवुन त्यांचे टॉवर्स जिंकुन आपल्या टीमला गौरव मिळवुन द्या. आपण जगभरातील खर्या खेळाडुंशी युद्ध कराल ज्यात दोन वाईल्ड बॉसेस आणि चार विभिन्न जंगल भाग असतील. ह्या खेळात कायम वाढणार्या हीरोजचे संग्रह जे सर्वांच्या आवडी पुरवितील: मारेकरी, समर्थक, नेमबाज... कामेही, असे असंख्य पर्यंत आहेत. ह्यातील प्रत्येक त्याची ताकद, व्हल्नरेबिलिटीज तसेच रुप सारख्या स्वत:ची वैशिष्ट्ये घेऊन येतो. ह्याहीपेक्षा म्हणजे आपल्याला एक रणनीती बनवावी लागेल आणि आपल्या टीमवर्कवर लक्ष केंद्रीत करावे लागे. काही वेळा, ह्ल्ला करण्यापेक्षा सर्वात विवेकी निर्णय सदस्यांचा प्राण वाचवेल किंवा ह्ल्ल्यास अडवेल, निर्णय आपलाच असेल!
मोबाईल लिजेंडसनी हे नक्कीच आणलय: बँग बँग मॅचमेकिंग सिस्टमला विशेष टाळ्या. ह्या खेळात, प्रतिष्ठा, पॉईंटस आणि आपल्या हिरोजचे स्टॅटस हे त्यांच्या कौशल्याने आणि क्षमतेनुसार असतात म्हणुन जिंकण्यासाठी काही पेमेंटची जागाच नाही. मोबाईल लिजेंडसमध्ये आपणांस उचित आणि सुरक्षित वातावरण मिळेल ज्यात युद्धे संतुलित केली जातात आणि MOBA खेळ अँड्रॉइडवर डाऊनलोड करण्याचे हेच प्रमुख कारण आहे: स्पर्धात्मक खेळ म्हणजे निव्वळ मनोरंजन. ह्याच्या न्याय्यपणासह ह्याची मॅचमेकिंग सिस्टम फारच गतिमान आहे, म्हणुन आपण स्वत:स (उचित विरोधी खेळाडुंसह) वेळ न गमावता युद्ध सुरु कराल! म्हणजेच मेन्युंत किंवा वेटिंग स्क्रीन्सवर वेळ गमावणे नाही; फोन उचलला कि मोबाईल लिजेंड सुर केले कि काही सेकंदातच संतुलित युद्धाची मजा सुरु - कुठेही, केव्हाही. ह्या शिवाय, युद्धे तशी त्यामानाने चटकन होतात म्हणजेच मोबाईल लिजेंडस हा योग्य पर्याय आहे कारण थोडासा वेळ असतानाही घ्या सरळ (तरीही काँप्लेक्स) खेळानुभव!
मोबाईल लिजेंडसचे कंट्रोल्स हे उद्योगाच्या मानकांचेच आहेत, म्हणजे रणांगणावर जम बसविण्यासाठी आपल्याला जास्त शिकायची गरज नाही. डावीकडे आपल्या हिरोजच्या नियंत्रणासाठी जॉय स्टिक आणि उजवी अॅक्शन आणि स्किल्ससाठी. मोबाईल लिजेंडस हे नविनीकरण करीतच आहेत आणि ह्यात एक पर्याय आहे ज्यामुळे युद्धात लक्ष केंद्रीत करण्यात मदत मिळते: इक्विप करण्यासाठी टॅप. आता आपल्या हिरोजना इक्विप करण्यासाठी रणांगण सोडुन मेन्युन जाण्याची गरज नाही कारण एकाच टॅपमध्ये काम होते.
मोबाईल लिजेंडमधील आणखीन एक नविनीकरण हे खासकरुन त्यांच्यासाठी आहे ज्यांना युद्धात कनेक्शनची समस्या येते. प्रथमत: मोबाईल लिजेंडची वैशिष्ट्ये खासकरुन चटकन रिकनेक्ट सिस्टमने कनेक्ट होतात म्हणजे डिव्हाईसला इंटरनेट मिळताच खेळ चालू - आम्ही सेकंदांत बोलत आहोत! दुसर म्हणजे आपले हिरोज दुर्लक्षिले जात नाहीत कारण मोबाईल लिजेंडची डिसकनेक्ट झालेल्या खेळाडुंच्या कॅरेक्टरला कव्हर करण्याची अमेझिंग रणनीती ज्यामुळे खेळात बाधा येत नाही. त्यामुळे आपण स्वत:स कधीच 5v4 रणांगणात पहाणार नाहीत.
मोबाईल लिजेंडस: बँग बँग हे MOBA खेळ कसे डिझाईन केले जातात याचे आदर्श उदाहरण आहे, तेही फक्त पीसी साठीच नाही तर मोबाईल डिव्हायसेससाठीही. अद्वितीय ग्राफिक्स, अमेझिंग गेमप्ले आणि एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये या सर्वांसह रणांगणाचा राजा कोण आहे हे सिद्ध करण्याचा आपल्यासाठी एक सुंदर खेळ!